स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू

 वाडा - भिवंडी रस्त्यावर खड्ड्याने तरुणीचा बळी घेतला. तर नाशिक - पुणे मार्गावर तीन ठार.

Updated: Oct 10, 2019, 07:05 PM IST
स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू title=

ठाणे : जिल्ह्यातल्या वाडा - भिवंडी रस्त्यावर मृत्यूचे तांडव सुरु असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. खड्ड्याने पुन्हा तरूणीचा बळी घेतला. स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर तरूणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ही घटना रात्री ११ वाजता ही घटना घडली. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे येथील जनतेने प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.

नेहा आलमगीर शेख या २३ वर्षीय डॉक्टर तरुणीचा खड्ड्यांमुळे बळी गेला आहे. नेहा आपल्या भावासोबत घरी परतत असताना स्कुटी खड्ड्यात आदळली. त्यामुळे मागे बसलेल्या नेहा यांचा तोल गेला आणि त्याखाली पडल्या. मागून येणाऱ्या ट्रकने नेहाला चिरडले. नेहाचे पुढील महिन्यात लग्न असल्याने ती ठाणे येथे लग्न खरेदीसाठी गेली असता घरी परतत असतांना अपघात त्यांचा बळी गेला. 

पुणे - नाशिक महामार्ग अपघात, तीन ठार

संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक महामार्गावर कर्हे घाटानजीक भीषण अपघात झाला. भरधाव कार चालकाने ट्रकला धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. गणेश दराडे, श्रीकांत आव्हाड, अजय केदार या तिघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना बाहेर काढलं. या अपघातामुळे पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती.