पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने १३ वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
आरोपी महिलेने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. या प्रकरणाचा कुणालाही तपास लागला नव्हता. मात्र, अखेर हा प्रकार उघडकीस आला आहे.
बोईसरमध्ये ४ डिसेंबर रोजी पोलिसांनी फरीदा भारती नावाच्या महिलेच्या घरावर छापा मारला. बोईसरमधील गांधीपाडा परिसरात राहणाऱ्या या महिलेच्या घरात देहविक्रीचे रॅकेट चालवला जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आणि ४ तरुणींची सुटका केली.
#Maharashtra: Woman arrested in Palghar's Boisar for running a brothel, confessed to killing her husband 12 years back and dumping his body in a septic tank pic.twitter.com/Ch34Pxb2ql
— ANI (@ANI) December 8, 2017
पोलिसांनी छापेमारी दरम्यान केलेल्या तपासणीत पतीच्या हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे.
#Maharashtra: Woman arrested in Palghar's Boisar for running a brothel, confessed to killing her husband 12 years back and dumping his body in a septic tank pic.twitter.com/Ch34Pxb2ql
— ANI (@ANI) December 8, 2017
४३ वर्षांच्या फरीदाने सांगितले की, १२ वर्षांपूर्वी तिने आपला पती सहदेव याची हत्या केली होती. सहदेव झोपलेला असताना फरीदाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सहदेव याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सेप्टिक टाकीतून मानवी सांगाडा जप्त केला असून आता अधिक तपास सुरु आहे.