मुंबई : Wine in Maharashtra: काही लोक विनाकारण मद्यराष्ट्र म्हणून सरकारला बदनाम करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये घरपोच पुरवठा करण्याचा विषय सुरु आहे. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही, असे प्रत्युत्तर विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, काही नियम आणि अटी घालून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा विचार आहे. पुढील बैठकीत सर्व बाबींचा सारासार विचार करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ( Ajit Pawar on Wine Sale Issues)
अजित पवार म्हणालेत, वाईन आणि दारु यात फरक आहे. आपल्याकडे द्राक्ष, काजू आदीपासून वाईन तयार होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात. आपल्याकडे वाईनला मागणी नाही. मात्र, काही लोक विनाकारण मद्यराष्ट्र म्हणून सरकारला बदनाम करत आहेत. मध्यप्रदेशमध्ये घरपोच पुरवठा करण्याचा विषय सुरु आहे. त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. काही नियम आणि अटी घालून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा विचार आहे. पुढील बैठकीत सर्व बाबींचा सारासार विचार करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
दुकानामधून आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन मिळताना दिसणार आहे. यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मद्यराष्ट्र करुन ठेवलं आहे, अशी टीका केली आहे. यावरुन अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत भाजप राज्यात जे सुरु आहे, त्यावर काही बोलणार आहात का, असा टोला लगावला.