राजकारण सोडावं असं वाटतं, का म्हणतायत नितीन गडकरी, पाहा

नितीन गडकरी राजकारण सोडणार? त्या एका वक्तव्यानं चर्चेला उधाण

Updated: Jul 24, 2022, 09:39 AM IST
राजकारण सोडावं असं वाटतं, का म्हणतायत नितीन गडकरी, पाहा  title=

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या विकासकामांसोबत नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. गडकरी नेहमी रोखठोक बोलतात. त्यांनी सध्याच्या राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले आपण कधी राजकारण सोडतोय असं कधी कधी वाटतं.

सध्याचं राजकारण पाहता गडकरी देखील या सगळ्याला कंटाळलेत का असा प्रश्न उपस्थित होतो. नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या राजकारणाचा खरा अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. राजकारण हे सत्ताकारण झालंय असं गडकरी म्हणाले. 

राजकारण या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे. जुन्या काळात महत्मा गांधींपासून राजकीय परंपरेन चालत आलं ते राजकारण होतं. पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. 

आता जे आपण बघतो ते केवळ शंभर टक्के सत्ताकारण आहे. आता हे समीकरण बदललं असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गडकरींनी हे केलेलं मोठं वक्तव्य आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नितीन गडकरी राजकारण सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.