NAGPUR MAHAPALIKA : नागपूर महापालिका कुणाकडे? भाजप सत्ता राखणार की महाविकास आघाडी धक्का देणार?

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत राज्यात पहायला मिळणार आहे. 

Updated: May 31, 2022, 04:05 PM IST
NAGPUR MAHAPALIKA : नागपूर महापालिका कुणाकडे? भाजप सत्ता राखणार की महाविकास आघाडी धक्का देणार?  title=

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागपूर महापालिकेने प्रभागाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. या सोडतीमधून काहीना दिलासा तर काहींचे वॉर्ड राखीव झाल्याने कही खुशी, काही गम असेच वातावरण आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत राज्यात पहायला मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या हातात असणारी सत्ता खेचुन घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत आहेत. तर शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे.

नागपूरमध्ये आरएसएसचे मुख्यालय असल्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात कायम राखण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच  मुंबई पाठोपाठ नागपूरचे महत्व जास्त आहे. नागपूर महापालिकेत 52 प्रभाग असून यात 156 सदस्य आहेत. यासाठी जाणून घेऊ नागपूर महानगर पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण.

अनुसूचित जातीसाठी 31 जागांपैकी 16 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

अनुसूचित जमातीच्या 12 जागा राखीव असून यातील 6 जागा महिलांसाठी आहेत.

अनुसूचित जातीच्या 31 जागांपैकी 16 जागा महिलांसाठी राखीव

1 अ, 2 अ, 10 अ, 13 अ, 14 अ, 15 अ, 16 अ, 20 अ, 27 अ, 30 अ, 37 अ, 38 अ, 39 अ, 43-अ, 45 अ, 52 अ

सर्वसाधारण महिला 12 जागा महिलांसाठी जागा

6 ब, 17 ब, 22 ब, 23 ब, 29 ब, 31 ब, 32 ब, 35 ब, 40 ब, 42 ब, 48 ब,49 ब

माजी महापौर संदीप जोशी यांच्या प्रभाग 40 मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष अशी सोडत निघाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. तर, माजी क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या प्रभाग क्रमांक 46 मध्येही अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष अशी आरक्षण सोडत निघाली आहे...

महत्वाचे म्हणजे मावळते महापौर दयाशंकर तिवारी अडचणीत आले असून त्यांच्या प्रभाग 23 मध्ये महिलांसाठी आरक्षण राखीव झाले आहे.