Washim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न

Washim Marriage by police news: लग्नासाठी अनेक जण पळून जाऊन लग्नही करतात. कधीकधी आपल्या जातीतले नाहीत म्हणून आईवडिल, घरचे लग्नाला विरोध करतात. अनेकांना त्यांचे लग्नही नापसंत असते. तर कधी प्रेमविवाहालाही घरच्यांकडून कडाडून विरोध होतो. सध्या अशाच काहीसा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. परंतु त्यांचे नशीब मात्र फिरले आहे. त्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यानं ते पोलिस ठाण्यात जाताच त्यांचे लग्न चक्क पोलिसांनीच लावून दिले आहे. 

Updated: Dec 13, 2022, 12:20 PM IST
Washim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न  title=
washim police news

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: लग्न हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे लग्नासाठी, प्रेमासाठी (marriage) अनेक जण वाट्टेल ते करायला तयार असतात. सध्या अशाच एका घटनेनं सगळीकडे खळबळ माजली आहे. प्रेमात पडल्यानंतर आपल्या सर्वांना लग्नासाठी आपल्या घराच्यांची विनवणी ही करावी लागते त्यामुळे लग्नात येणारे अडथळेही आपल्याला पार करावे लागतात. घराच्यांचा लग्नासाठी होकार असणं नव्या जोडप्यासाठी अत्यंत महत्त्वाचं (lovers want to marry) असतं. त्यासाठी त्यांना अनेक फंडे आजमावे लागतात. परंतु अशी अनेकजणं समाजात आहेत त्यांच्यासाठी लग्नाला होकार मिळवणं म्हणजे तारेवरची (family) कसरत असते. सध्या असाच एक प्रकार वाशिम येथे घडला आहे. (washim shirpur news police arranges two young couple marriage because of opposition of the family) 

आपल्या घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यानं वाशिम येथील एक प्रेमी युगुल अडचणीच्या पेचात सापडले होता. त्यांची भेट झाली ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला होता. परंतु घरून होकार मिळणार नाही याची त्यांना खात्री असावी. वाशिमच्या (washim news) शिरपूर येथील अतिश कांबळे वय 23 वर्ष हा युवक आणि 22 वर्षीय मुलगी प्रशाली वानखडे या दोन प्रेमयुगलांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवस हे दोघ जण गावाबाहेर होते. परंतु जेव्हा घर सोडून हे दोन प्रेमी युगुलं परत गावात आले त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार असल्याचे सांगून टाकले. ते गावात परत आल्यानंतर घरच्यांना लग्न करणार असल्याचे सांगितले परंतु कारण काही स्पष्ट केले नाही. त्यांना लग्न करायचे आहे यावर ते दोघंही ठाम होते पण त्या दोघांच्या घरच्या मंडळींना मात्र त्यांचे हे लग्न स्विकारच नव्हते. 

हेही वाचा - Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

आणि संसाराला सुरूवात झाली... 

घरच्यांना लग्न मान्य नाही म्हणून ते निराश झाले नाहीत. तर त्यांनी पोलिस ठाण्यात (police) जाण्याचा निर्णय घेतला. पोलिस ठाण्यात गेल्यावर मात्र काहीतरी वेगळंच घडलं. ''आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम (love stories) करतो. आम्हाला लग्न करायचे आहे'', असे सांगत हे जोडपं चक्क वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये आले. दोघेही सज्ञान असल्याने प्रेमी युगुलांच्या भावना लक्षात घेता पोलीसांनी देखील त्या दोघांचा चक्क पोलीस ठाण्यातच विवाह लावला. कुटुंबियांकडून नववधूला त्रास देणार नाही, अशी हमीही पोलिसांकडून दिल्यानंतर नवदाम्पत्य वर-वधू आनंदाने घरी गेले. 

पोलिसांनी (police ties knot for two young lovers) लग्न थाटात लावून दिले. त्यांच्या लग्नाला पोलिसांसह अनेक थोडेफार गावकरही आले. लग्नाला विरोध असल्यानं त्यांचे कुटुंबीय लग्नाला काही येऊ शकले नाही. परंतु त्या दोघांची अवस्था पाहून पोलिसांनीही मोठ्या मनानं त्यांचे लग्न लावून दिले. लग्नाचा व्हिडीओही (marriage viral video) त्यांनी केला आहे. हे लग्न आता सगळीकडे जोरात चर्चेत आहे.