Waqf Board Notices to Latur Farmers: महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तब्बल 103 शेतकऱ्यांच्या (Latur Farmers) जमिनीवर वक्फ बोर्डाने (Waqf Board Land Dispute) दावा केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. सर्व शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. नोटीस आलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.
लातूरच्या तळेगावमधील 103 शेतक-यांना वक्फ बोर्डानं नोटीस पाठवली आहे. लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणानं संभाजीनगर कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे. तर, शेतकरी या विरोधात आक्रमक झाले आहेत. या जमिनी पिढ्यानपिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत. त्या वक्फ बोर्डाच्या नाहीत असं शेतक-यांनी सांगितले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील वक्फ बोर्डाला प्रशासनानं GR काढून निधी दिल्याची बाब समोर आली होदती. त्यानंतर मुख्य सचिवांनी तो आदेश मागे घेतला. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती.
जेवढा करायचा असेल तेवढा विरोध करा. मात्र संसदेत वक्फ बोर्डाचं विधेयक पारित होणारच असा इशारा अमित शाह यांनी शरद पवारांना दिलाय. तसेच मुंबईतील बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना मायदेशी पाठवणार असल्याचं विधानही अमित शाहांना केले होते. मुंबईमध्ये बोरिवलीत आयोजित प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.