'अजित पवार यांची जागा घ्यायचीय'; हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

रोहित पवार अजून बच्चा आहेत. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. हसन मुश्रीफ यांच्या आरोपांवर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 24, 2023, 09:09 PM IST
'अजित पवार यांची जागा घ्यायचीय'; हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर   title=

Rohit Pawar on Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. रोहित पवार यांनी  अजित पवार यांची जागा घ्यायची आहे असा घणाघाती आरोप हसन मुश्रीम यांनी केला होता. हसन मुश्रीम यांच्या आरोपाला रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर देताना गंभीर आरोप केला आहे.   

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात राष्ट्रवादी वाढू दिली नाही

कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी वाढू दिली नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या नातेवाईकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्योजकांना अडचणीत आणल्याचा गंभीर आरोपही रोहित यांनी केला आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या निशाण्यावर आता हसन मुश्रीफ असणार, हे यातून स्पष्ट होतंय.  कोल्हापुरात 25 ऑगस्टला शरद पवारांची सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार कोल्हापुरात आले आहेत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात ही सभा होतेय. ही सभा खूप मोठी होईल असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.  जिल्ह्यातील नेते पदाधिकारी शरद पवारांसोबत नसले तर खरा कार्यकर्ता पवार साहेबांच्या सोबत आहे, त्यामुळे दसरा चौक देखील कमी पडेल अशी भीती वाटत असल्याचं असं रोहित पवारांनी म्हटले आहे.

रोहित पवार बच्चा आहे - हसन मुश्रीफ

रोहित पवारांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. ते नवखे आहे, ते कशासाठी एवढे धाडस करत आहेत….वो अभी बच्चा है अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली होती. कोल्हापुरात सहा आमदार होते आता कमी झाले. पुण्यात देखील अशी परिस्थीती झाली आहे. आमदार कमी जास्त होत राहतात. म्हणून काही पक्षाची ताकद कमी आहे असे होत नाही असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.

जयंत पाटील समर्थकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट 

सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांना मोठा धक्का बसलाय. जयंत पाटील समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. माजी महापौर,माजी नगरसेवकांसह ग्रामीण भागातील पदाधिका-यांचा यात समावेश होता. मुंबईत ही बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील समर्थक होते. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षांच्या संघटनेची जबाबदारी स्वतःवर घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच ही बैठक घेतली.