जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतदान

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

Updated: Aug 1, 2018, 09:29 AM IST
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतदान title=

जळगाव : जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातल्या ४६९ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे. यासाठी २ हजार ७८० मतदान कर्मचारी कार्यरत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पालिका प्रशासनाने यावेळी विशेष प्रयत्न केले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसंच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या दृष्टीने ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली आहे.