सोलापूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनानं खास पत्रक काढून ही माहिती दिली आहे. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन करत विठ्ठल मंदिर खुले करण्याची मागणी केली होती.
पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मंदिर समितीचा निर्णय । वंचितच्या आंदोलनानंतरही मंदिर बंदच#PandharpurTemple @ashish_jadhao https://t.co/dNmVe4G9Pp pic.twitter.com/Y1iLKSO6ct
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 2, 2020
विठ्ठल मंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने दोन दिवसांपूर्वी जोरदार आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी बैठक बोलावली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली. गेल्या २२ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.