'शिक्षकांच्या बदल्यांसाठी अधिकारी चिरीमिरी घ्यायचे'

शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागातले अधिकारी तसंच मंत्रालयातले अधिकारी चिरिमिरी घ्यायचे

Updated: Jan 11, 2018, 08:00 PM IST
'शिक्षकांच्या बदल्यांसाठी अधिकारी चिरीमिरी घ्यायचे' title=

रत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागातले अधिकारी तसंच मंत्रालयातले अधिकारी चिरिमिरी घ्यायचे, अशी कबुली स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

रत्नागिरीत आयोजित शिक्षणाची वारी कार्यक्रमामध्ये विनोद तावडे यांनी हे विधान केलं. शिक्षक बदल्यांचं काम ऑफलाईन केलं जायचं. तेव्हा अधिकारी चिरीमिरी घ्यायचे. त्यामुळे हा गैरप्रकार टाळण्यासाठीच शिक्षक बदल्यांचं काम ऑनलाईन करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी यावेळी स्पष्ट केलं.