आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'

Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2024, 01:12 PM IST
आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..' title=
संदीप देशपांडेंनी पहिली प्रतिक्रिया

Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आपण 225 ते 250 जागा लढवण्याची तयारीला लागावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लोकसभेला नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागवाटपाचा तिढा सुरु असल्याचा संदर्भ देत आपण जागा मागण्यासाठी कुठेही जाणार नसल्याचं राज यांनी सांगितलं आहे. असं असतानाच आता कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाईल यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेेचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेंविरुद्धही मनसे उमेदवार देणार आहे. या मतदारसंघातून मनसेचे नेते संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली जाईल असं अशी चर्चा आहे. याचसंदर्भात आता स्वत: संदीप देशपांडेंनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

लोकसभेत लढणार नाही असं जाहीर केल्यापासून...

"तुम्हाला वरळीमधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे" असं म्हणत संदीप देशपांडेंना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी, "कोणाला उमेदवारी द्यायची, कोणी लढायचं याचा निर्णय राज ठाकरे घेतील," असं म्हटलं. वरळी मतदारसंघातील तयारीसंदर्भात बोलताना, "आमच्या माहिम मतदारसंघाच्या बाजूचा हा मतदारसंघ आहे. ज्या दिवशी राज ठाकरेंनी सांगितलं की आपण लोकसभा लढत नसून विधानसभेच्या तयारीला लागा. तेव्हापासून तिथे (वरळीमध्ये) आम्ही तयारी सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या भेटीगाठी असतील किंवा आता लोकसभेला झालेल्या मतदानाचा आढावा घेणे, यासारखी कामं आम्ही सुरु केली आहेत," असं संदीप देशपांडेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'

आदित्य ठाकरेंचं समोर आव्हान, याबद्दल काय म्हणाले संदीप देशपांडे

"आदित्य ठाकरे हे स्वत: तिथे आमदार आहेत. दोन विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी इथं आव्हान आहे असं वाटतं का?" असा प्रश्न संदीप देशपांडेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, "महाराष्ट्रसैनिक तेथील ताकद आहे. महाराष्ट्रसैनिकाची ताकद राज ठाकरे आहेत. महाराष्ट्रसैनिक कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही," असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा

 

मताधिक्य कमी झाल्याचा फायदा घेणार?

वरळी विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे खासदार झालेल्या अरविंद सावंत यांचं मताधिक्य घटलं आहे. त्यामुळेच आता या संधीचा फायदा घेऊन थेट ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात उमेदवार देण्यासाठी मनेच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या वेळी मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नव्हता. आदित्य ठाकरे हे 2019 ला पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यावेळेस त्यांच्या काकांचा पक्ष असलेल्या मनसेनं आदित्य ठाकरेंविरोधात कोणालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं नव्हतं. मात्र आता मनसे आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार देण्याची तयारी करत आहे.