व्हिडिओ : रुग्णालयात स्टेचर नव्हतं म्हणून महिलेला फरफटत नेलं

पाय फॅक्चर झाल्याने ही महिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आली होती

Updated: Jun 27, 2018, 11:03 AM IST

नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याचा एक व्हिडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झालाय. पायाला प्लास्टर असलेल्या एका महिलेला दोन नातेवाईक महिला कापडावर बसवून ओढत नेतानाचा हा व्हिडिओ आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने या महिलेला तिच्या नातेवाईकांनी अश्या पद्धतीने एका चादरीवर बसवून फरफटत नेले.

पाय फॅक्चर झाल्याने ही महिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आली. त्या महिलेच्या पायाला प्लास्टर करण्यात आले आणि नंतर तिला सुट्टी देण्यात आली. 

मात्र, रुग्णालयातून बाहेरच्या गेटपर्यत रुग्ण नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने महिलेसोबत आलेल्या नातेवाइकांनी एका कापडावर बसवून ओढत नेले. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केली. 'स्ट्रेचर उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागत होता. त्यासाठी त्या रुग्ण महिलेला थांबवण्यात आले होते. मात्र कोणालाच काही न सांगता तिच्या नातेवाईकांनी तिला अशा पद्धतीने ओढत नेल्याचे' स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलंय. 

चौकशीनंतर दोषीवर कारवाई होणार असल्याने अधिष्ठात्यांनी सांगितलंय. या व्हिडीओतील रुग्ण महिलेबाबत अधिक माहिती मिळालीय.