भुशी धरण ओव्हरफ्लो... पर्यटकांचा कुंभमेळा!

...आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले

Updated: Jun 27, 2018, 08:48 AM IST
भुशी धरण ओव्हरफ्लो... पर्यटकांचा कुंभमेळा! title=
फाईल फोटो

लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण स्थळ असणारे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. मागील चार दिवसांपासून सलग पडत असलेल्या पावसामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत होती. केवळ तो ओव्हरफ्लो केव्हा होतो हे पाहणे बाकी होते. अखेर मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणी धरणाच्या सांडव्याला लागल्यावर या सांडव्यावर लावण्यात आलेल्या फळ्या बाजूला करण्यात आल्या आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले.

भुशी धरणासोबतच पर्यटकांचे आकर्षण असणारे तुंगार्ली धरण, लोणावळा धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मात्र, यातही भुशी धरणाबाबत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये एक वेगळेच आकर्षक असते. 

प्रत्येक पावसाळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर धरणाच्या भिंतीवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्यासाठी याठिकाणी जणू पर्यटकांचा कुंभमेळाच भरत असतो. त्यामुळे या शनिवार रविवारी या धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.