वाशी-पनवेल दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प

हार्बर मार्गावर वाशी-पनवेल दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेलापूरजवळ लोकलचा पेंटोग्राफ तुटल्यानं वाहतूकीचे तीन तेरा झालेय.

Updated: Dec 26, 2017, 01:31 PM IST
वाशी-पनवेल दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प  title=

नवी मुंबई : हार्बर मार्गावर वाशी-पनवेल दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेलापूरजवळ लोकलचा पेंटोग्राफ तुटल्यानं वाहतूकीचे तीन तेरा झालेय.

सोमवारही नेरुळ ते पनवेल दरम्यान दुरुस्ती असल्यानं प्रवाशांचे हाल झाले होते. तसंच सीवुड स्टेशन दरम्यानही नवीन लाईन टाकण्याचं काम सुरु असल्यानं चार दिवसांपासून हार्बरच्या प्रवाशांची गैरसोय होतेय.

 दरम्यान, सीएसटी ते वाशीदरम्यान वाहतूक सुरु आहे. मात्र, बेलापूर येथील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण न झाल्याने वाशी ते पनवेल वाहतूक ठप्प पडलेय. याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.

तर दुसरीकडे उरण-बेलापूर मार्गाच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या काळातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यात आता मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल सुरुच असल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.