आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान

 लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. 

Updated: Jul 23, 2018, 10:27 AM IST
आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान title=

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर, हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्यानं शासकीय महापूजा केली. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

जाधव दाम्पत्याला आनंद

दरम्यान, लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. विठ्ठलपूजा सुरू असताना, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची हटके विठ्ठलपूजा 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पंढरपुरात होणाऱ्या आषढी वारीत कोणतीही अनुचीत घटना होऊ नये. यासाठी शासकीय पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२३, जुलै) हटके पद्धतीने विठ्ठलाची पूजा केली. आज आषाढी एकादशी. अवघा वैष्णवांचा मेळा पंढरपूरला जमणार. पण, मुख्यमंत्र्यांनी या मेळ्यात हजेरी न लावता आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. दरम्यान पंढरपुरात शासकीय पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले.

varkari anil jadhav worships vitthal on the auspicious day of ashadhi ekadashi | Ashadhi Ekadashi : जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान 

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर परमोच्च आनंद

भेटीलागी जीवा लागलीसे आसं.. ही भावना असते प्रत्येक वारकऱ्याची.. आणि म्हणूनच पांडूरंगाच्या भेटीनंतर या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर परमोच्च आनंद दिसतो. हाच आनंद आजही तमाम वारकऱ्यांमध्ये पंढरपूरमध्ये पहायला मिळत आहे.