पुण्यातील शाळांमध्येही वंदे मातरम सक्तीचे?

मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याचा निर्णय नुकताच मुंबई महापालिकेनं घेतलाय. आता पुण्यातील शाळांमध्ये देखील वंदे मातरम सक्तीचं करण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीकडे हा प्रस्ताव पाठवलाय. 

Updated: Aug 12, 2017, 04:27 PM IST
पुण्यातील शाळांमध्येही वंदे मातरम सक्तीचे? title=

पुणे : मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याचा निर्णय नुकताच मुंबई महापालिकेनं घेतलाय. आता पुण्यातील शाळांमध्ये देखील वंदे मातरम सक्तीचं करण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीकडे हा प्रस्ताव पाठवलाय. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेलं तसेच प्रखर राष्ट्रभिमान जागृत करणारं वंदे मातरम हे सर्व शाळांमध्ये गायले जावं तसेच सर्व शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र बसवण्यात यावं असं या प्रस्तावात म्हटलय. 

मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी वंदे मातरमच्या सक्तीबतचा प्रस्ताव दिला होता. त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यामुळे तो मुंबई महापालिकेत मंजूर झाला. आता त्या पाठोपाठ पुण्यात तसा प्रस्ताव आहे. इथं शिवसेनेच्या नगरसेवकाने हा प्रस्ताव सादर केलाय. त्याला सत्ताधारी भाजपचा पाठिंबा मिळणार का हे पाहावं लागेल. येत्या बुधवारी स्थायी समितीची बैठक आहे. त्यात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.