उस्मानाबाद : विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ? असा सवाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन केला. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
मोठ्या उत्साहात सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. या संमेलनाला वादाचाही पार्श्वभूमी होती. या संमेलनाला जाऊ नका, असं आवाहन ब्राह्मण महासंघानं उदघाटक ना. धो. महानौरांना केलं होतं. साहित्यिकाला जात नसते, असं महानोरांनी संमेलनाच्या मंचावरुनच ठणकावलं.
दुसरीकडे या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहू नका, असे आवाहन करणारं पत्र पुण्याच्या ब्राह्मण महासंघानं आपणाला पाठवलंय, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ साहित्यिक, कवी, पद्मश्री आणि संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनी केला.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली. सुधारणावादी लेखक, विचारवंत अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे. २०१३ सालचा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.