केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुण्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. किवळेफाटा हायवेवर रस्त्याच्या मध्ये तवेरा गाडी उभीर होती. आठवलेच्या गाडीच्या चालकाला सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण ही गोष्ट लक्षात येताच चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आठवले यांच्या गाडीमागे असणारी पोलीस गाडी त्यांच्या गाडीला धडकली. 

Updated: Jun 28, 2017, 10:04 AM IST
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात title=

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुण्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. किवळेफाटा हायवेवर रस्त्याच्या मध्ये तवेरा गाडी उभीर होती. आठवलेच्या गाडीच्या चालकाला सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण ही गोष्ट लक्षात येताच चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आठवले यांच्या गाडीमागे असणारी पोलीस गाडी त्यांच्या गाडीला धडकली. 

या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. अपघातावेळी रिपाइंचे उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे आणि सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हे देखील त्यांच्यासोबत होते.

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रामदास आठवले निघाले होते. पण अपघातानंतरही त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.