मुंबईत यायचंही धाडस नाही- नितीन गडकरी

गडकरी म्हणतात.... 

Updated: Jun 16, 2020, 05:01 PM IST
मुंबईत यायचंही धाडस नाही- नितीन गडकरी  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : सध्याच्या घडीला मुंबईत जाण्याचं अजिबात धाडस नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. शहरात सध्याच्या घडीला असणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गडकरींचं हे वक्तव्य पाहता त्यांच्या मनात कोरोनामुळं या मायानगरीप्रती भीती बसली आहे हे स्पष्ट होत आहे. 

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच महाराष्ट्रातातही परिस्थिती वेगळी नाही. इथं तासातासाला रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं राज्यशासनापासून आरोग्य यंत्रणांपर्यंत सर्वांपुढं मोठं आवाहन उभं राहिलं आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येनं १ लाखांचा आकडा केव्हाच ओलांडला असून, हा आकडा आता चिंताजनक पद्धतीनं वाढू लागला आहे. हीच परिस्थिती आणि मुंबईतही कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण पाहता आता नितीन गडकरींनाही परिस्थितीची चिंता भेडसावू लागली आहे. 

'सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत येण्याचा आता माझा कोणताही मनसुबा किंवा तितकं धाडसही नाही. पण ही वेळ नक्कीच बदलेल यावर माझा विश्वास आहे', असं गडकरी म्हणाले. 

आम्हाला वाद नकोय, पण वेळ पडली तर घाबरणारही नाही; चीनची दर्पोक्ती 

 

 

देशभरात कोरोना व्हायरसमुळं उभी राहिलेल्या संकटं पाहता त्यावर मात करण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून या व्हायरसच्या विळख्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यस्थेला आता कुठं चालना मिळू लागली आहे. बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर अनेक उद्योगधंदे आणि कार्यालयं सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातही अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये काही महत्त्वाच्या सुविधा प्राधान्य क्रमामनुसार पूर्वपदावर आणल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, असं करत असताना कोरोना रुग्णांचा वाढता आकडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेतल नसल्यामुळं प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.