कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या

Updated: Feb 23, 2020, 09:37 AM IST
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या  title=

नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्यात. दक्षिण आफ्रिकेत पुजारीला अटक करण्यात आली आहे. हत्या, खंडणीसह सुमारे २०० गंभीर गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी पोलिसांना हवा होता. गेल्या काही वर्षांपासून रवी पुजारी पोलिसांना चकवा देत होता. 

दक्षिण आफ्रिकेतल्या सेनेगलमध्ये पुजारीला अटक करण्यात आलीये. विशेष म्हणजे सेनेगल पोलिसांच्या तावडीतूनच गेल्या वेळी पुजारी फरार झाला होता.

काही रॉ ऑफिसर्स आणि कर्नाटक पोलिसदेखील दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांच्या मदतीने पुजारीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय.

पुजारीला आता भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.