महाराष्ट्रातील 'या' सर्वात मोठ्या धरणाची वाटचाल मायनसकडे..

मागील वर्षी उजनी धरण आणि पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.  

Updated: Jun 4, 2022, 06:48 PM IST
महाराष्ट्रातील 'या' सर्वात मोठ्या धरणाची वाटचाल मायनसकडे..  title=

जावेद मुलाणी,  झी २४ तास, इंदापूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी साठा असलेले आणि पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेलं उजनी धरण उपयुक्त साठ्यातून मृत साठ्यात जात आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दरम्यान, मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण यंदा प्रथमच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘मायनस’मध्ये जात आहे. आज अखेरीस उजनी धरणात 0.91 टक्के "उपयुक्त" पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उजनी धरण एक ते दोन दिवसात मायनस मध्ये जाणार आहे

मागील वर्षी उजनी धरण आणि पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.

उजनी धरणात ससध्या 0.91 टक्के "उपयुक्त" पाणीसाठा आहे. अवघ्या दोन दिवसात पाणीसाठा मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षी सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येतं. हे पाणी नदीद्वारे सोडण्यात येत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो.

पावसाळ्यात उजनी धरणामध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. त्यामुळे यंदा धरण मायनस मध्ये जाणार नाही असे वाटत होते. मात्र येत्या दोन दिवसांमध्ये पुन्हा धरण मायनस मध्ये जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी जलाशयात ६४. १५ टीएमसी  पाणीसाठा आहे. त्यापैकी ०.४९  टीएमसी जिवंत साठा   आहे. सध्याची जलाशयाची टक्केवारी ०.९१  टक्के आहे. वेळेत पाऊस सुरू झाला नाही, तर पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसून येत आहे.

Ujani Dam usable water count is going in negetive due to massive heat