नाणार: उद्धव ठाकरेंची सभा होणारच : विनायक राऊत

 नाणार रिफायनरी विरोधातील एकजूट फोडण्याचा प्रयत्न काही संधीसाधू लोक करतायत असा आरोप राऊत यांनी केलाय

Updated: Apr 22, 2018, 07:13 PM IST

नाणार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नाणारमध्ये सोमवारी होणारच असल्याचं स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. तसंच सभेवर ग्रामस्थांचा बहिष्कार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. नाणार रिफायनरी विरोधातील एकजूट फोडण्याचा प्रयत्न काही संधीसाधू लोक करतायत असा आरोप राऊत यांनी केलाय. तसंच स्थानिकांना भडकावण्याचा काम होतंय असंही त्यांनी म्हटलंय.