Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी तयार, धनुष्यबाण न मिळाल्यास...पुढे काय?

 Uddhav Thackeray Plan B : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे गटाने दुसरा प्लान रेडी ठेवला आहे. 

Updated: Sep 29, 2022, 01:32 PM IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी तयार, धनुष्यबाण न मिळाल्यास...पुढे काय? title=

मुंबई : Uddhav Thackeray Plan B : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. राज्यात शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर आता सत्तासंर्घषानंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह (Dhanushya Ban) कोणाचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे गटाकडून दोन्ही आमचेच असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मात्र आता न्यायालयाने निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेईल, असे सांगत चेंडू निवडणूक आयोगाकडे टाकला आहे. मात्र, असे असले तरी  उद्धव ठाकरे गटाविरोधात निर्णय गेला तर  यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच  उद्धव ठाकरे गटाने दुसरा प्लान रेडी ठेवला आहे. कारण आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर तयारी केली आहे.

निवडणूक चिन्हाबाबत ठाकरे गटाचा प्लान बी

धनुष्यबाण न मिळाल्यास नव्या चिन्हासह लढण्याची तयारी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. हाच निवडणूक चिन्हाबाबत ठाकरे गटाचा प्लान बी आहे. शिवसेनेनं धनुष्यबाणाशिवाय निवडणूक लढवण्यासाठी प्लान बी तयार केला आहे. शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं तर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा झटका बसू शकतो. यामुळे ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठी प्लान बी तयार केलाय. नव्या पक्षचिन्हासह लढण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरु केली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर खलबतं पार पडली. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? हा पेच आता निवडणूक आयोगाकडे आहे. जर धनुष्यबाण चिन्ह गेले तर काय करायचं हा प्लान ठरल्याची माहिती मिळतेय...

उद्धव ठाकरेंचा प्लान बी काय असू शकतो?

- पहिलीच निवडणूक आहे, असं समजून लढायचं आहे.
- नव्या पक्षचिन्हासह लढण्याची तयारी सुरु
- नवं चिन्ह पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया तयार  
- ठाकरेंची इंटरनेट, सोशल मीडिया टीम तयार
- शिवसेनेने पहिली निवडणूक चिन्ह नसतानाच लडवली होती
- शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षासोबत 1967मध्ये युती केली होती.
-शिवसेनेचे तेव्हा 42 नगरसेवक निवडणूक आले होते. 

1 नोव्हेंबरला निवडणूक आयोग काय निर्णय देण्याची शक्यता?

- शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडेच राहू शकतं
- शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकते
- शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाऊ शकते