Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोकणात बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. इथ्या दोन गावांनी भेटी देत त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) विरोध असणाऱ्या ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. हा प्रकल्पा चांगला असता तर राज्यातले सर्व पोलीस इथं का आणले जातायत? ग्रामस्थांवर लाठ्या का बरसवल्या जात आहेत? जसं मी इथे आलो तसं त्या सूपारीबहाद्दरांनी इथं यावं आणि ग्रामस्थांसमोर प्रेझेंटेशन द्यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पण लोकं विरोध करत असतील तर शिवसेना म्हणून मी विरोध करणार अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
नाणार प्रकल्प होऊ नये त्या आंदोलनात शिवसेना ग्रामस्थांच्या पाठिशी उभी होती. प्रकल्प हवा असेल तर त्याचं स्वागत आहे. मी मुख्यमंत्री असातना आता जे सुपारी घेऊन गद्दार फिरतायत त्याच गद्दारांनी सांगितलं होतं की बारसूतल्या ग्रामस्थांचा विरोध नाही. बरीचशी जमीनही निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी कमी होईल, एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. अशी त्यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर मी एक पत्र केंद्राला पाठवलं. रिफायनरी इथे होऊ शकते की नाही याची चाचपणी करुन ग्रामस्थांनी संमती दिल्यानंतर मी इथेू येऊन इथल्या ग्रामस्थांना प्रेझेंटेनश दिलं असतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
माझ्या काळातील चांगले प्रकल्प पून्हा महाराष्ट्राला द्या?
आता मी दिलेल्या पत्राचं भांडवल केलं जात आहे पण, माझ्याच काळात वेदांत फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्प गुजरातला का दिलात, चांगले प्रकल्प गुजरातला देण्यात आले. हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि ते प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या. चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला दिले. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला दिले असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा पाठिंबा असेल तर आम्ही मध्ये येण्याचं कारण नव्हतं. ज्या अर्थी दडपशाही सुरु आहे. त्याअर्थी या प्रकल्पात काहीतरी काळंबेरं आहे त्यानंतर राजन साळवी यांनीही प्रकल्पाला विरोध केला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ज्यांनी जमिनीत दलालीचा मलिदा खाल्ला आहे त्यांना परत पैसे द्यावे लागतील म्हणून हे आम्हाला विरोध करत आहेत असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही टोला लगावला आहे. तुमच्या दौऱ्याला नारायण राणे यांनी विरोध केला आहे असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा उल्लेख सुक्ष्म असा केला.