Uddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ!

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.

Updated: Jun 19, 2023, 08:58 PM IST
Uddhav Thackeray: अवली लवली अन् जनता 'कावली', उद्धव ठाकरेंचा लाव रे 'तो' व्हिडिओ! title=
Uddhav Thackeray On Devendra Fadanvis

Uddhav Thackeray in Shanmukhananda Auditorium: शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात जोरदार भाषण दिलं. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोले लगावले आहेत. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत. मोदी सूर्य आहेत तर तुमचा सूर्य मणिपूरमध्ये उगवत का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. कोविडची लस मोदींनी तयार केली तर बाकीचे काय गवत उपटत बसले होते का? असा तिरकस सवाल यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग केला म्हणत उद्धव ठाकरेंचा भर कार्यक्रमात फडणवीसांनाच्या भाषणेचा व्हिडिओ दाखवला.

सर्वांना समीर चौघुलेंच्या दवाखान्यात पाठवायला पाहिजे. समोपदेशनासाठी सगळे अवली आहे. एकापेक्षा एक अवली आहेत, लवली कोणीच नाहीये... त्यांना सांगायला पाहिजे जनता कावली आहे, तुम्ही आमची झोप उडवली. सगळंच पळवली, असं म्हणताच संपूर्ण सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडले. मणिपूरमधील परिस्थितीवरून त्यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती निर्माण झालीये, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिंदेचा गटाला हरामखोर म्हणत टोला लगावला. तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या नावाशिवाय जमत नाही. उद्धव ठाकरे म्हणजे माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्वजण आहात, असं ठाकरे म्हणाले. मणिपूरमध्ये राहणारे रिटायर्ड लेफ्टनंट जनरल निशिकांत शेख यांनी ट्वीट करून मणिपूर हे स्टेटलेस स्टेट असल्याचं म्हटलं आहे.म्हणजेच मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य संपुष्टात येऊन तिथे सीरियासारखी परिस्थिती झालेली आहे.

आणखी वाचा - आरोपाला कामाने उत्तर देणार- मुख्यमंत्र्याचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, गारदीचा अर्थ पेशवेकाळात लढाईत गोंधळ घालायला, वसुली करायला भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, असं म्हणत उद्घव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला टोले लगावले आहेत. डबल इंजिन सरकार असं म्हणतायेत, कुठंय डबल इंजिन. डबल इंजिन नुसतंच वाफा सोडतंय, असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.