'उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य' असं का वाटतं देवेंद्र फडणवीस यांना

उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात एक साम्य, पाहा काय म्हटलेत देवेंद्र फडणवीस

Updated: May 4, 2022, 02:10 PM IST
'उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य' असं का वाटतं देवेंद्र फडणवीस यांना title=

नागपूर : 1 राजी झालेल्या एका कार्यक्रमात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना टोला लगावला होता. 'राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. आजपर्यंत एकाच व्यक्तीवा गाता येतं, असं मला वाटत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याला उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता दोघांमध्ये एक साम्य आहे, उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जी काय आपली पातळी आहे, ती वर ठेवली पाहिजे, आणि असं काही आलं की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देणं टाळलं पाहिजे, पण हा त्या दोघांचा प्रश्न आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी जशात तसं उत्तर दिलं. 

अमृता फडणवीस यांनी दिलं होतं उत्तर
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीस यांनीही ट्वीट करत उत्तर दिलं होतं,  मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे.  छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असं म्हटलं अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग देखील केलं.