भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

Updated: Dec 20, 2022, 06:08 PM IST
भूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग title=

Maharashtra Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात(Maharashtra Winter Session 2022 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर भूखंडावरुन झालेल्या आरोपामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत  विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. 

निर्णय योग्य होता, तर मग निर्णयाला स्थगिती का दिली? उद्धव ठाकरेंचा सवाल

न्यासा भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप केल्याबद्दल कोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. निर्णय योग्य होता, तर मग निर्णयाला स्थगिती का दिली? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.  

100 कोटींचा भूखंड कवडीमोल भावात दिला; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

विरोधक मुख्यंमत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. याच मागणीवरून 
विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. विरोधकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 100 कोटींचा भूखंड कवडीमोल भावात दिला असा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेमका काय आरोप झाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटींचा विकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत केला. न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. तर विरोधी पक्षनेते आणि खडसे सभागृहाची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रत्युत्तर दिलं

न्यासावरून विरोधकांनी राळ उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं. आम्ही बिल्डरला 330 कोटी फुकट देत नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आपण कोणताही गैरप्रकार केला नाही. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप करण्यात येतायेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भूखंड कवडीमोल भावात कसा दिला असा सवल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.