खासदार उदयनराजे 'पुष्पा'च्या प्रेमात, पाहा व्हिडीओ

उदयनराजेंंना पडली 'पुष्पा' सिनेमाची भुरळ; लुंगी घालून शहरात मारला फेरफटका

Updated: Jan 16, 2022, 09:15 PM IST
खासदार उदयनराजे 'पुष्पा'च्या प्रेमात, पाहा व्हिडीओ  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा : खासदार उदयनराजे भोसले पुष्पाच्या प्रेमात पडले आहेत. आता पुष्पा कोण असा विचार तुमच्या मनात येईल. तर पुष्पा ही महिला नसून सिनेमा आहे. पुष्पा सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. याचं प्रत्यय आज सातारकरांना पाहायला मिळाला आहे. 

पुष्पा सिनेमाची भुरळ तरुणांपासून ते सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना पडली आहे. आता त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेही मागे राहिले नाहीत. खासदार उदयनराजे भोसले 'पुष्पा'च्या प्रेमात पडल्याचं सातारकरांना पाहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

पुष्पा फ्लावर नाही फायर हा डायलॉग तर खूप जास्त लोकप्रिय झाला. उदयनराजे म्हटलं की त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी पुष्पातील गाण्यावर हटके स्टाईलनं कॉलर उडवली आहे. इतकच नाही तर लुंगी घालून त्यांनी साताऱ्यात फेरफेटका मारला. 

उदयनराजे नेहमीच आपल्या हटके लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता त्यांनी पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर हटके अंदाजात साताऱ्यात केलेल्या लूकची महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर चर्चा होत आहे.