सातारा : काल,आज आणि उद्या जे काही करणार ते तुम्हाला आणि इथल्या मान्यवरांना केंद्रबिंदू मानूनच करणार असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
आपल्या ५१ व्या वाढदिवशी आयोजित सोहळ्यात मिळालेल्या प्रेमामुळे ते भारावून गेले. आपल्या वेगळयाच शैलीसाठी प्रसिद्ध असलेले साता-याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा एक्कावन्नावा वाढदिवस आज साजरा होत आहे.
आपल प्रेम असच कायम राहो. यामुळे उर्जा मिळते आणि आपली सेवा करण्याची प्रेरणा मिळते. आपण सर्वांनी प्रेम दिलं यातच धन्य झालो. शब्द अपुरे पडतायत.
कधी माझ्याकडून चुक होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने मला सांगा. तुमच्या भावनेच, प्रेमाचं माझ्याकडून अवमान होणार नाही.
यानिमित्तात उदयनराजेंनी त्यांच्या साता-यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कार्यक्रमाला सातऱ्यातील त्यांचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,खासदार विजयसिंह मोहीते पाटील, राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, यावेळी उपस्थित होते. पण राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी या कार्यक्रमावर संपूर्ण बहिष्कार घातला.
उदयनराजेंच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुक्तविद्यापिठाचं बिरुद वापरलं. त्याचप्रमाणे वाढदिवसाला उदयनराजेंनी केलेल्या तीन मागण्या लवकरात मान्य करण्याचं आश्वासन दिलं.