दोन दुचाकींची धडक, तीन ठार आणि तीन जखमी

जखमींवर वाई इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

Updated: Nov 7, 2018, 12:58 PM IST
दोन दुचाकींची धडक, तीन ठार आणि तीन जखमी  title=

वाई : वाई-सुरुर रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन गंभीर जखमी झालेत. दुचाकीस्वारांची  धडक एवढी भीषण होती की त्यावरील सहाही जण रस्त्यावर फेकले गेले आणि त्यात हे सर्व जण गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सुयोग वाडकर, सायली कळंबे, प्रसाद सोनावणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

तर इतर तीन जखमींवर वाई इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.