भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला मोठी आग, चालकाचा होरपळून मृत्यू

Truck on Fire After the Accident : जिल्ह्यात भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक विचित्र घटना घडली. दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.  

Updated: Jul 6, 2022, 11:28 AM IST
भीषण अपघात; अपघातानंतर ट्रकला मोठी आग, चालकाचा होरपळून मृत्यू title=

भंडारा : Truck on Fire After the Accident : जिल्ह्यात भंडारा-तुमसर राज्य मार्गावर एक विचित्र घटना घडली. दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकला मोठी आग लागली. या लागलेल्या आगीत  एका ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. यावेळी मोठी आग लागली. बघता बघता आगीचा भडका उडाला. याचवेळी एका ट्रक चालकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकच्या चालकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.

दाबा गावाजवळ कोळसा भरुन जात असलेला ट्रकला भरधाव येणाऱ्या टिप्परने अमोरासमोर जोरदार धड़क दिली. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर स्पार्क होऊन कोळशाने भरलेला ट्रकला आग लागली. वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा चालक याने गाडीतून उडी मारुन बाहेर पडला. त्याचवेळी दुसऱ्या ट्रकमधील चालक या अपघातात गाडीतच अडकला. त्याला बाहेर पडण्यास मार्ग मिळाला नाही.

आगीत टिप्परचे कॅबीन पूर्णतः जळून खाक झाले. दरम्यान कोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग टिप्परलाही लागली. यावेळी अडकले चालक या आगीत होरपळून निघाले. याची माहिती वरठी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. 
त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलचे जवान दाखल झालेत. त्यांनी आग आटोक्यात आणली.