मालवण : पुण्यातून कोकणात आलेल्या पर्यटकांपैकी सिंधुदुर्गातील समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६ जणांना वाचविण्यात यश आलेय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवबाग समुद्रात काही पर्यटक पाण्यात उतरले होते. त्यापैकी काही जणांना तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. हे पर्यटक पुण्याचे रहिवासी आहेत.
पर्यटनासाठी हे सर्व जण पुण्यातून कोकणात आले होते. मौज मजा करताना ते समुद्रात आले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतलेल्यापैकी ६ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, दोघांचा दुदैवी मृत्यू झाला.