Afzal Khan Tomb Controversy: प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवर अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचा जल्लोष आहे परंतु आता अफजलखानाच्या कबरी शेजारीच अजून दोन कबरी (Afzal Khan Tomb) सापडल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अफजल खान ,सय्यद बंडा यांच्या कबरी शेजारी सेवेकरीची एक कबर तर अतिक्रमण काढलेल्या एका खोलीत दुसरी कबर सापडल्याची माहिती समोर येते आहे. या कबरींबाबत प्रशासन अनभिज्ञ असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. (two more tomb found near afzal khan tomb information not yet confirmed)
अतिक्रमण हटवले :
अफजल खानाच्या कबरी शेजारी अतिक्रमण करत मशिदीचं स्वरूप देण्यात आले होते. पूर्वी अफजल खानाची कबर काही फूट जागेत होती मात्र अतिक्रमण करत वन विभागाची मोठी जागा अडकवण्यात आली होती. यामुळे 1990 पासून या अतिक्रमणाचा वाद सुरु आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात जात हायकोर्टाने स्थानिक प्रशासनाला अफझल खानाच्या कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कारवाई करण्याआधीच हा वाद पेटला होता.
प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबर परिसरातील अतिक्रमणावर राज्य शासनाने (Maharashtra Government) कारवाई हे अतिक्रमण जमीनदोस्त केले आहे. अफझल खान कबर परिसरात अनधिकृत बांधकाम हे 15 ते 20 गुठ्यांच्या परिसरात आहे तसेच ज्या जागेवर बेकायदा अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, ती जागा वनविभागाची आहे अशी माहिती मिळते.
कबरीकडे होती प्रवेश बंदी :
प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्याकबर परिसरात अफजल खानाचं उदात्तीकरण केलं जातं असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली आहे. या ठिकाणाचं अनधिकृत बांधकाम काढण्यात यावं या मागणीसाठी 2006 मध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले होते. तेव्हापासून अफजल खान कबरीकडं प्रवेश बंदी करण्यात आली आहे.