अरेरे, अपघातग्रस्तांना मदत करीत असताना चार जणांना टेम्पोने चिरडले, दोघांचा मृत्यू

मुंबई - पुणे एक्सप्रेस (Mumbai-Pune highway) मार्गावर एका भरधाव टेम्पोने अपघातग्रस्तांना मदत करीत असताना कारसह चार जणांना चिरडल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.  

Updated: Apr 20, 2021, 09:22 AM IST
अरेरे, अपघातग्रस्तांना मदत करीत असताना चार जणांना टेम्पोने चिरडले, दोघांचा मृत्यू title=

नवी मुंबई :  मुंबई - पुणे एक्सप्रेस (Mumbai-Pune highway) मार्गावर एका भरधाव टेम्पोने अपघातग्रस्तांना मदत करीत असताना कारसह चार जणांना चिरडल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एका कारला अपघात झाला होता. यावेळी त्यांना मदत करण्यातासाठी  पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष  सुशांत मोहिते, नगरसेवक तेजस कांडपिले आणि त्यांचे सहकारी तात्काळ त्याठिकाणी पोहोचले. मात्र, त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांच्या थांबलेल्या कारला मागून जोराची धडक दिली. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर सकाळी हा अपघात झाला. (Two killed in car-tempo accident on Mumbai-Pune highway)

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला कंटेंनरने मागून धडक दिली होती. या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष  सुशांत मोहिते (26), पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले  आणि  इतर दोन जण अपघातस्थळी पोहोचले. ते मदत करत असताना पाठिमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णचेंदामेंदा झाला. यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येते. कोरोना काळात कडक संचारबंदी असल्याने रस्त्यावर फारशी वाहने नसल्याने हा टेम्पो भरधाव येत असल्याचे काहींही सांगितले.

कार अपघातात जखमी झाल्यांना मदत करण्यासाठी  आपली कार घेऊन थांबले होते. यावेळी अचानक मागून आलेल्या आयशर टेम्पोने  त्यांच्या मर्सिडीज कारला धडक दिली. या धडकेत सुशांत मोहिते  यांचा मृत्यू झाला. तसेच प्रथमेश बहिरा (24) याचा देखील मृत्यू झाला आहे. हर्षद खुदकर  हे जखमी झाले असून त्यांना MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले यांना सुदैवाने काहीही इजा झालेली नाही ते सुखरुप असल्याचे सांगण्यात आले.