औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले. मतमोजणी केंद्रात एका गटाचा निकाल विजयी झाल्याचे जाहीर करताच अभूतपूर्व गोंधळ झाला.
शुक्रवारी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ४ जिल्ह्यात अधिसभेच्या प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थांचालकाच्या प्रतिनिधींचे मतदान पार पडले होते. त्याची मोजणी रविवारपासून सुरू झाली. ही मतमोजणी करताना एका गटातील निकालानंतर ८३ मतांची तफावत निघाली. त्या गटातील निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते आणि ओरभुत उमेदवाराचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रामध्ये आमनेसामने आले.
यात चांगलीच हाणामारी आणि शिवीगाळ झाली. त्यामुळे तासभर मतमोजणी प्रक्रिया बंद पडली होती हा प्रकार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचने शिक्षणमंत्र्यांकडे केलीय.