म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये महेश लांडगेंची बॅनरबाजी

पिंपरी चिंचवडमध्ये भव्य दिव्य वाढदिवस साजरा करण्याची पद्धत तशी काही नवी नाही.

Updated: Nov 27, 2017, 11:54 PM IST
म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये महेश लांडगेंची बॅनरबाजी title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भव्य दिव्य वाढदिवस साजरा करण्याची पद्धत तशी काही नवी नाही. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकच चर्चा होती ती, म्हणजे महेश लांडगे यांच्या जोरदार आणि भव्य-दिव्य वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची...

चौकाचौकात एखाद्या मॉडेल आणि अभिनेत्याला लाजवतील अशा वेगवेगळ्या पोजेस् मधले लांडगे यांचे फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. वाढदिवसाची ही भव्य-दिव्यता म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तार डोळ्यासमोर ठेवल्याचं, हे उघड गुपित आहे. विस्तार कधीही होवो लांडगे यांना मंत्री पद मिळेल म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे निमित्त साधत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय.