आंबोली घाटात आणखी दोन मृतदेह आढळले

सिंधुदुर्गातील आंबोली घाट आता पर्यटनापेक्षा गुन्हेगारी स्पॉट बनतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात या भागात हत्या करून टाकलेले मृतदेह सापडू लागले आहेत.

Updated: Nov 16, 2017, 08:23 PM IST
आंबोली घाटात आणखी दोन मृतदेह आढळले title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील आंबोली घाट आता पर्यटनापेक्षा गुन्हेगारी स्पॉट बनतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात या भागात हत्या करून टाकलेले मृतदेह सापडू लागले आहेत.

सांगलीतल्या पोलिसांनी याच भागात आरोपीचा मृतदेह टाकला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी आंबोलीत शिक्षकाचा मृतदेह सापडला होता. 

ही घटना ताजी असतानाच आज खोल दरीत आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. यात एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा मृतदेह आढळून आलेत.