इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात यात सातत्यानं वाढच होतेय

Updated: Sep 19, 2017, 08:32 PM IST
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर  title=

सोलापूर : पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात यात सातत्यानं वाढच होतेय, त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. या अन्यायी इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर गॅस टाकी, पालेभाज्या आणि धान्य ठेवून सरकारचे निषधाचे फलक लावून घोषणा बाजी करण्यात आली.

तर तिकडे औरंगाबादेही आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद-जालना रस्त्यावर तब्बल अर्धातास रास्ता रोको करण्यात आल्याने दोनही बाजूने वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. भर रस्त्यात चूल मांडून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

सर्वसामान्यांना गरजेचा असलेला गॅस देखील महाग झाल्याने सरकार जनतेची फसवणूक करत असल्याची भावना जनतेच्या मनात आहे. त्यामुळं राज्यपालांनी सरकार बरखास्त करावी अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली.