Crime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर

Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.

Updated: Dec 28, 2022, 08:04 PM IST
Crime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर  title=
yavatmal news

Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे. यवतमाळच्या मारेगाव येथे एका 12 वर्षीय मुलीचा बालविवाह लावण्यात आल्यानंतर तिचा पती मुलीला चार महिन्याची गरोदर करून पसार झाला आहे. पीडित मुलीच्या आईनेच हा बालविवाह लाऊन दिला होता. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. करणवाडी गावातील 12 वर्षाच्या मुलीचा विवाह कुटुंबीयांनी 5 महिन्यापूर्वी लावून दिला होता. चार महिन्याची गरोदर (Pregnant) राहिल्यावर तपासणीसाठी दवाखान्यात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केल्या जात असले तरी समाजात आजही प्रशासनाला अंधारात ठेऊन बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत आहे. (Twelve-year-old girl 4 months pregnant exposed to shocking form of child marriage Yawatmal Crime News)

बालविवाहांचे प्रकार घडताना यापुर्वीही दिसले आहे. नुकत्याच आलेल्या एका माहितीनुसार काही दिवसांपुर्वीच नाशिकमध्येही काही धक्कादायक प्रकार समोर आला होता. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी 30 टक्के बालविवाह होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेक मुलींना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. कमी वयातच मातृत्व आल्यानं जन्माला येणाऱ्या नवजात बाळासह आईचीही प्रकृती कमी राहते. असे प्रमाण सध्या चिंताजनक आहे. सध्या याकरिता काही ठिकाणी प्रयत्नही होताना दिसत आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यापूर्वी विवाह केल्यास कायद्याने गुन्हा आहे. यात लग्न जुळवणाऱ्यांसोबत (Marriage News) लग्नात उपस्थित राहणाऱ्यांवरही कारवाई होते. त्यांना दोन वर्ष कोठडीही होऊ शकते.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार थांबेना: 

आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सहा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंधमध्ये घडली. जुलै 2022 ते 23 डिसेबर 2022 दरम्यान घडली आहे. सहाही आरोपींवर पोलिसांनी पॉक्सोसह अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.