तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....

महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 18, 2024, 01:40 PM IST
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....  title=

महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बदलीसंदर्भातील अधिकृत पत्रात सांगण्यात आलं आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा. 

तुकराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी असून आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. ज्या विभागात त्यांची बदली होती तेथील कर्मचाऱ्यांना नेहमीच त्यांच्या शिस्तीचा धाक असतो. पण त्यांचा हाच कडक स्वभाव अनेकदा त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करतो आणि यामुळे अनेकदा बदलीही झाली आहे. मुंढे यांची गेल्या 18 वर्षात जवळपास 21 वेळा बदली झाली आहे. 

तुकाराम मुंढे यांचा परिचय

तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत. हे गाव 100 टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते. तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेलं आहे. तुकाराम मुंढे यांचं गावातच 10  वीपर्यंत शिक्षण झालं. तुकाराम मुंढे यांच्या मोठ्या भावाला आयएएस व्हायचं होतं पण आर्थिक परिस्थिती बाजूने नसल्याने त्यांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ती अपेक्षा तुकाराम मुंढेंकडे व्यक्त करत तुला कलेक्टर व्हायचं आहे असं सांगितलं होतं. तुकाराम मुंढे यांना 12 वीला बायोलॉजी ग्रुपला 92 टक्के मार्क होते. 

तुकाराम मुंढे पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये फेल झाले. त्यांना 865 मार्क मिळाले. जे मेरिटपेक्षा फार कमी होते. यानंतर तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात ते प्रिलिअम पास झाले पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं. म्हणून तुकाराम मुंढे यांनी परत तिसरा प्रयत्न केला. यावेळी तुकाराम मुंढे यांनी प्रिलियम आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत पोहोचले. मुलाखत झाली पण अंतिम निवड झाली नाही. 2003 साली एमपीएससीचा अंतिम निकाल आला. तुकाराम मुंढे यांच्या यांचं क्लास 2 मध्ये सिलेक्शन झालं. 

2004 साली तुकाराम मुंढे प्रिलिअम पास झाले, मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरु केली. 2005 च्या एप्रिल-मे महिन्यात तुकाराम मुंढे यांची मुलाखत पार पडली. 11 मे 2005 रोजी अंतिम निकाल आला त्यावेळी तुकाराम मुंढे यांची भारतातील रँक 20 होती.