नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकच्या नागरिकांची माफी मागितली आहे. कारण तुकाराम मुंढे यांचा 'व़ॉक विथ कमिश्नर' हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी, वॉक विथ कमिश्नर या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या वैयक्तिक कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आणि अखेर नागरिकांची माफी मागावी लागली. तुकाराम मुंढे यांना हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला म्हणून त्यांनी नागरिकांची माफी मागितली.
तुकाराम मुंढे यांच्या आईची तब्येत बिघडल्याने त्यांनी आपला कार्यक्रम पुढे ढकलला असं सांगण्यात येत आहे. कार्यक्रम पुढे ढकलावा लागला असला, तरी संबंधित अधिकाऱयांनी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तुकाराम मुंढे हे जेव्हा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते, तेव्हा देखील त्यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी देखील लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
तुकाराम मुंढे यांची ही कारवाई सर्वात जास्त गाजली
आणखी दणका! मुंढेंकडून ३ कामचुकार अधिकाऱ्यांना नोटीस
तुकाराम मुंढेंची पाच मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई
नगरसेविकांच्या पतींची लुडबुड चालणार नाही- तुकाराम मुंढे