Nanded Accident : ट्रक - कार अपघात तीन ठार, एक गंभीर

Truck-car accident at Nanded : ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला.  

Updated: Jun 4, 2022, 08:17 AM IST
Nanded Accident : ट्रक - कार अपघात तीन ठार, एक गंभीर title=

नांदेड : Truck-car accident at Nanded : ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील 4 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला. नांदेड - देगलूर मार्गावरील शंकरनगरजवळ हा भीषण अपघात झाला. काल रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. 

नरसीकडून देगलूरकडे स्विफ्ट कार जात होती तर ट्रक देगलुरकडून येत होता. शंकरनगर कुंचेली फाट्याजवळ समोरासमोर दोन्ही गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील शंकर जाधव , महानंदा जाधव आणि कल्पना शिंदे तिघे जागीच ठार झाले तर धनंजय शिंदे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

स्वाती शिंदे गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमक्या कुणाच्या चुकीमुळे अपघात घडला हे कळू शकले नाही. शंकरनगर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी दाखल होत मदतकार्य केले.