नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अविश्वास ठरावाच्या पूर्वसंध्येला राजीनामा दिला. त्यामुळे आज होणाऱ्या अविश्वास बैठकीतील हवा निघून गेली आहे.
त्र्यंबकेश्वर नगरी सध्या भूमाफियांच्या रडारवर आहे त्यामुळे येथील नगरपालिकेत सध्या राजकारण रंगले आहे या राजकारणाचा बळी ठरल्याचे नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
त्र्यंबक शहराच्या विकास आराखड्यात बदल केल्याने वादग्रस्त ठरलेल्या नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी गुरुवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
दुसरीकडे नगरपालिकेच्या तेरा नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केल्याने त्यावर विचार करण्यासाठी शुक्रवारी सकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे राजकीय हालचाली वाढल्या होत्या. मात्र नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने हवाच निघून गेलेय.