Dhananjay Munde Accident : गाडीचा चक्काचूर, बोनेटही झालं डॅमेज... धनंजय मुंडेंच्या कारचा Video समोर!

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर... Video आला समोर!

Updated: Jan 4, 2023, 05:59 PM IST
Dhananjay Munde Accident : गाडीचा चक्काचूर, बोनेटही झालं डॅमेज... धनंजय मुंडेंच्या कारचा Video समोर! title=

Dhananjay Munde Car Accident Video : राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. मंगळवारी रात्री 12.30 च्या सुमारास परळीमधील आझाद चौकात हा अपघात झाला. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघाताबद्दल माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्या अपघात झालेल्या गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे. (Trending Dhananjay Mundes car accident video viral latest marathi news)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचं बोनेट पूर्णपणे डॅमेज झालेलं दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याचं सांगितलं होतं. मुंडे मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळी घराजवळ कार्यकर्ते जमले होते. घरातून निघत असताना मुंडे यांच्या डोक्याला गमजा बांधलेला होता. यामध्ये त्यांच्या कपाळाचा भाग दिसणार नाही याची काळजी घेताना कार्यकर्ते दिसले.  

धनंजय मुंडे यांच्या कपाळाच्या वरचा भाग दिसणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जात होती. यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याची झालेली गर्दी पाहून धनंजय मुंडे हे तात्काळ रुग्णवाहिकेत बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

 

लातूर विमानतळावरून खास एयर अंबुलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईकडे नेण्यात आले. धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता त्यात ते जखमी झाले आहे मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात पुढील उपचार त्यांच्यावर होणार आहे त्यामुळे परळी येथून ते ॲम्बुलन्स मार्गे लातूरला गेले आणि तिथून एअर ॲम्बुलन्सने आता मुंबईकडे रवाना झाले आहेत.

नेमका कसा झाला अपघात?
धनंजय मुंडे मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी घेऊन परळीकडे परतत असताना आझाद चौकात त्यांच्या गाडीला अपघात झाला. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. अपघातामध्ये मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.