महाबळेश्वर : पावसाचा शिडकावा सुरू झाल्यानंतर फिरस्तीसाठी उत्सुक असणाऱ्यांची पावलं घरात थांबत नाहीत. पावसामुळं न्हाऊन निघालेला निसर्ग पाहतानाच्या भारावून टाकणाऱ्या भावना, आपण या सृष्टीचक्रातले किती लहानसे घटक आहोत याची अनुभूती हे सर्व जाणून घेण्यासाठी कैक मंडळी घराबाहेर पडतात. (Mahabaleshwar pratapgad valley viral video)
फिरण्यासाठी बाहेर पडलं असताना काही गोष्टींचा मात्र विसर पडतो आणि होत्याचं नव्हतं घडून बसतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहिल्यानंतर हेच लक्षात येत आहे.
महाबळेश्वरमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. कारण, इथं प्रतापगडाच्या दिशेनं जाणाऱ्या घाटरस्त्याला लागून असणाऱ्या दरीत कोसळलेल्या तरुणाचा सुखरुप वाचवण्यात आलं आहे.
पावसाची संततधार सुरु असतानाही महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनंतर तरुणाला बाहेर काढलं. माकडाला चिप्स देण्यासाठी म्हणून हा तरुण गेला होता.
पुढे सरसारवलं असता त्याचा पाय घसरला आणि तो थेट 100 फूट खोल दरीत जाऊन कोसळला. समोर मृत्यू आ वासून उभा असतानाच नियतीनं मात्र या तरुणासाठी काही वेगळं लिहून ठेवलं आणि अखेर त्याला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.