ठाण्यात झाड कोसळून पाच वाहनांचं नुकसान

...

Updated: Jun 17, 2018, 03:02 PM IST

ठाणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी पुन्हा एकदा जोर धरला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार कायम आहे. ठाण्यात रविवारी सकाळी झाड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झालंय.

ठाण्यातील इटर्निटी मॉलच्या जवळ ही घटना घडलीय. झाड कोसळून एकुण पाच वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाहीये. झाड हटवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहे.