रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे

पुण्यातले रिक्षावाले आणि पोलीस यांचं वैर सर्वश्रुत आहे. मात्र पुण्यातल्या पोलिसांच्या खाबुगिरीचा नमुना उघड झालाय. 

Updated: Dec 27, 2017, 09:36 PM IST
रिक्षाचालकाने तक्रार केल्याने परत दिले पोलिसाने पैसे title=

पुणे : पुण्यातले रिक्षावाले आणि पोलीस यांचं वैर सर्वश्रुत आहे. मात्र पुण्यातल्या पोलिसांच्या खाबुगिरीचा नमुना उघड झालाय. 

पोलिसाने पैसे दिले परत

एका रिक्षाचालकावर कारवाई करताना पोलिसांनी त्याच्याकडून ६५० रुपये वसूल केले. मात्र तो रिक्षाचालक वरिष्ठांकडे तक्रारीसाठी गेल्याचं कळताच त्या पोलिसानं घेतलेले पैसे स्वतःहून परत आणून दिले. या पार्श्वभूमीवर भ्रष्ट पोलिसांवर कारवाईची मागणी रिक्षा संघटनेनं केलीय. 

कठोर कायवाईची मागणी

पुण्यामध्ये रिक्षाचालकांची मनमानी नवीन नाही. भाडं नाकारणं ही बाब तर नित्याचीच...मात्र या सगळ्याला वाहतूक पोलिसच जबाबदार असल्याचं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. वाहतूक पोलीस चिरीमिरी घेऊन रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई झाल्यास असे प्रकार बंद होतील.