मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल भरायला बाहेर पडणार असाल तर आधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे प्रतिलिटर दर काय आहेत ते जाणून घ्या. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महागले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 9, 2024, 09:27 AM IST
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर title=

Today Petrol Diesel Price on 9 January 2024 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होतान दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यातच आज (9 जानेवारी 2024) पेट्रोलचे नवे दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले आहे.

आज  WTI क्रूड कमी झाले असून प्रति बॅरल $70.94 वर विकले जात आहे. तर $2.64 च्या घसरणीसह प्रति बॅरल $76.12 वर व्यापार करत आहे. दरम्यान निवडणूकीपूर्व इंधनाच्या किंमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.  त्यातच आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल 52 पैशांनी  महागले आहेत. मात्र पेट्रोल आणि डिझेल नेमके कोणामुळे महागले. तसेच पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार किती कर लावते, याबाबत अनेकांना जाणून घ्यायचंय. 

सरकारी तेल कंपन्या ठरवतात किमती

केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर प्रचंड कर लावतात. देशातील प्रमुख तेल कंपन्या, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात. पेट्रोल आणि डिझेल हे केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारांना 2022-23 च्या नऊ महिन्यांत पेट्रोलियम उत्पादनातून 545,002 कोटी रुपये मिळाले. 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारी खर्चाची पातळी 774,425 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 672,719 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 555,370 कोटी रुपये, 2018-19 मध्ये 757,632 कोटी रुपये आणि सरकारी खर्चाची पातळी 2021-21 मध्ये आहे. 18 तिजोरी 543,026 कोटींच्या पेट्रोलियम उत्पादनांनी भरली होती.

इंधनावर सर्वसामान्य किती भरतात? 

एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकार तुमच्याकडून किती कर वसूल करतात ते समजून घ्या. 1 मे 2023 मध्ये दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये होती. यामध्ये 35.61 कोटी रुपयांचा समावेश असून त्यापैकी 19.90 रुपये केंद्र सरकारकडे आणि 15.71 रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत गेले. याशिवाय, एक लिटर पेट्रोलसाठी डीलरचे कमिशन 3.76 रुपये आणि वाहतुकीसाठी 0.20 पैसे जोडले जातात.

घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोज एसएमएसद्वारे तपासू शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या नंबर पाठवावा लागेल. 

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर 

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोल 105.38 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

नाशकात पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 रुपये आणि डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर