कोल्हापूर : यंदाही तिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला शालू भेट देण्यात आला आहे. कधी पत्नी तर कधी आई या नात्यानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती हा शालू स्विकारत होती. यंदा मात्र हा शालु इतर भाविकांच्याप्रमाणेच देवस्थान समितीनं स्विकारला आहे.
दरवर्षी येणारा शालू तिरुपतीची पत्नी या नात्यानं स्विकारला जायचा, त्यामुळं आंबाबाई भक्त मंडळाच्या भावना दुखावल्या जायच्या. वास्तविक अंबाबाई ही तिरुपतीची आई मानले जाते, पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चुकीच्या पायंड्यामुळं हा वाद निर्माण झाला होता.
पण आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं आपली चूक सुधारत तिरुमला देवस्थानकडुन आलेला शालू इतर भाविकांप्रमाणे स्वीकारुन त्याची पावती तिरुमला देवस्थानला दिली आहे.